जयकिसनवाडी येथे तरूणाचा झोपेत अकस्मात मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । रात्री जेवण करून झोपलेल्या तरूणाचा झोपेतच अचानक मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास जयकिसन नगरात घडली. याबाबत शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय चंद्रकांत पडशीकर (वय-36) रा. जयकिसनवाडी जळगाव हा खासगी कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री जेवण करून 11 वाजेच्या सुमारास जेवण करून झोपला. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास वडील चंद्रकांत पडशीकर यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र उठला नाही. गल्लीतील तरूणांनी त्याला तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. विवेक नारखेडे यांनी मयत घोषीत केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. विवेक नारखेडे यांच्या खबरीवरून शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोना संतोष खवले करीत आहे.

Protected Content