पारोळा प्रतिनिधी । दोन जवानांमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सीआयएसएफ जवानाला गोळी लागून मृत्यु झाल्याची घटना (दि.१४) रोजी घडली असून (दि.१५) रोजी त्यांच्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे देवगावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात मधील काकडपाड येथे केंद्रीय सुरक्षा बल सीआयएसएफमध्ये कार्यरत असलेले संजय राजाराम ठाकरे (वय-४७) यांची तात्पुरत्या कालावधीसाठी जम्मू काश्मीर मधील उधमपूर येथे नियुक्ती करण्यात आली होती. कर्तव्य बजावत असतांना त्यांचे सहकारी बी.एन.मृर्ती व एम.तस्लीम यांच्यातील वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झालेत. ही घटना (दि.१४) रोजी घडली असून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. परंतू संजय ठाकरे यांचे (दि.१५) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास निधन झाले. या घटनेमुळे ठाकरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ते पारोळा तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी होते.
संजय ठाकरे यांच्या पश्च्यात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. संजय ठाकरे यांचे शव आज सकाळी (दि.१६) दिल्लीला आणणार असून दुपारी इंदोरला आणल्यानंतर रात्री उशीरा त्यांच्या मुळगावी देवगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.