जळगाव प्रतिनिधी । जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी तसेच गळ्यातील सोन्याची पोत चोरून नेल्याप्रकरणी 15 ते 20 जणांविरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, कल्पना प्रभाकर जाधव (वय-50) रा. पंडीत प्लाझा जळगाव हे कुटुंबासह राहतात. 19 सप्टेंबर रोजी कल्पना जाधव यांचे वडील भेटण्यासाठी आले. त्यावेळी अपार्टमेंटमध्ये राहणारे श्यामसुंदर लक्ष्मण पाटील व त्यांची पत्नी, सोमनाथ शिंपी, देवुकर यांचे भाडेकरू, योगेश शिंदे व त्यांची आई, प्लॉट नं.11 मध्ये राहणारा भाडेकरी, सुनिल शिंपी, नरेश नखोत, संदीप वराडे, चेतन जाधव, अजय सोनवणे व त्यांची पत्नी, नंदलाल बाविस्कर व त्यांची पत्नी, भिका चौधरी, विश्वनाथ चौधरी असून एकुण 15 ते 20 जणांनी त्यांच्या घरी येवून तुम्हाला येथे राहणार नाही व जातावाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यातील श्यामसुंदर पाटील, सोमनाथ शिंपी, योगेश शिंदे यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची 6.5 ग्रॅमचे मंगळसुत्र आणि 10 हजार रूपये रोख चोरून नेले. ही घटना सायंकाळी 7 ते 12 वाजे दरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन करीत आहे.