मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ओबीसींची जाती आधारित जनगणना न करण्याच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चाद्वारे चरण बद्ध आंदोलन करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून विविध मागण्यांसाठी 25 रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. भारत बंदला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी पाठिंबा दिला असून विविध संघटनांनी सुद्धा समर्थन दिले आहे. सदर मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल हे करणार आहेत. जनतेने तसेच सर्व व्यापारी बंधूंनी या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेद्वारा करण्यात आले आहे.
या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टी लोक सभा प्रभारी प्रमोद सौंदळे, खान्देश विभागाचे जिल्हा अध्यक्ष नितीन गाढे बहुजन मुक्ती पार्टी विधानसभा प्रभारी राजीव वानखेडे , बहुजन मुक्ती पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी पवार, तालुकाध्यक्ष ब्रिजलाल इंगळे, बुद्धिस्त इंटरनॅशनलचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ हिरोळे, भारतीय बेरोजगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष पारस हिरोळे, छत्रपती क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल हरणे, लहुजी क्रांती मोर्चाचे तालुकाध्यक्ष राजेश ढगे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश वानखेडे, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरुण जाधव, एन.एन.टी.एम तालुका अध्यक्ष शांताराम बेलदार, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक सुपडा हिरोळे आदींची उपस्थिती होती.