जामनेर प्रतिनिधी । शासन निर्णयानुसार ग्रामपंचायातीने आपल्या स्थानिक कर वसुलीतून जमा होणा-या रक्कमेमधील 3 टक्के निधी हा दिव्यागांना व्यवसायासाठी आर्थिक मदत म्हणून उपलब्ध करु देण्यात यावा यासाठी जागृत अपंग संघटनेच्या वतीने आज दि. 18 जुलै गुरुवार रोजी पंचायत समितीच्या अधिकारी व पदाधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी निवेदन घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पालवे यांनी वेळ काढूपणा दाखवून निवेदन स्विकारण्यास अनास्थ दाखवत ‘तुमचे आटोपुन घ्या नंतर मला बोलवा” असे सांगत ते आपल्या कक्षाकडे निघून गेले. त्यानंतर परत बोलवणे पाठवले. तेव्हा त्यांनी येवून निवेदन स्विकारले. शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतच्या स्थानिक कर वसुलीतील एकुण रक्कमेपैकी 3 टक्के रक्कम तसेच नवे शासन निर्णयानुसार 5 टक्के रक्कम दिव्यागांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून किंवा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असून याविषयी ग्रामसचिव मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. वा मुद्दाम अनभिज्ञ होत असल्याचे दिसते. याबाबत संघटनेचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ सुरळकर यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, शासन निर्णय अमलांत आल्यापासून त्या वर्षापासूनचा तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील जमा झालेल्या कर वसुलीतील दिव्यागांसाठी राखीव 3 टक्के रक्कम व सुधारित निणर्यानुसार 5 टक्के रक्कमेचा कसा विनियोग केला वा केला नाही याचा तपशील देण्याची मागणीही यावेळी सुरळकर यांनी केली. 3 दिवसांपुर्वी येथील परिषदेच्या वतीने स्थानिक कर वसुलतीच्या एकुण 3 टक्के शहरातील दिव्यागं बांधवांसाठी रक्कमचे धनादेश वाटप करण्यात आले. त्याच धर्तीवर आजच्या मागणी आंदोलनाचे स्वरूप होते. यावेळी पंचायत समिती सभापती निता पाटील, नवलसिंग राजपूत उपस्थित होते. गणेश साळुंखे, हर्षल पाटील, कैलास कोळी, रवी झाल्टे, पुजा पाटील, शांताराम गाडी लोहार, अलियार खान यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.