रावेर प्रतिनिधी । ठेवीदारांना न्याय देण्यास निष्प्रभ ठरल्याचा निषेध म्हणून आज जनसंग्राम ठेवीदार संघटनेने ठेवीदारांच्या आढावा बैठकीला उपस्थित न राहणार्या निबंधकांच्या खुर्चीला बेशरमी भेट देऊन ठिय्या मांडला.
जनसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात रावेर तालुक्यातील पतसंस्थाच्या ठेवीदारांनी आज सकाळी ११ वाजता येथील तालुका सहकार निबंधकांचे कार्यालय गाठले.जिल्हा उपनिबंधक एम.यु.राठोड यांच्या आदेशाने ठेवीदारांना आजच्या आढावा बैठकीत अंशतः चेक वाटप करण्यात येणार होते.मात्र तालुका निबंधक एस.एफ.गायकवाड निवडणुकीच्या बैठकीला जळगाव येथे असल्याने ठेवीदारांचा एकच संताप झाला.ठेवीदारांनी सहकार विभाग ठेवी परत करण्याच्या अंमलबजावणीत अगदी बेशरम भूमिका घेत असल्याने प्रतिकात्मक बेशरमी वनस्पती निबंधकांच्या खुर्ची व टेबलवर ठेवून सहकार विभागाचा धिक्कार केला. कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने व ठेवींबाबत ठोस आश्वासन मिळत नसल्याने संघटनेने रावेर पोलिसांना अटक करण्याची मागणी करत लेखी तक्रार दिली.यात तालुका कार्यालयाला टाळे ठोकून कायदेभंग करण्याचा ईशारा देऊन जोपर्यंत ठेवींचे चेक मिळत नाहीत तोपर्यंत जामीन न घेता अटकेत राहण्याचा पावित्रा जाहीर करून ठिय्या चालूच ठेवला.
या आंदोलनात डी.टी.नेटके,यशवंत गाजरे, कमल भिरुड,पंडित नेमाडे,गणेश सराफ,मिनाक्षी कांचन नेहते,नरहरी झांबरे,कलाबाई पाटील,गिरधर नारखेडे, सुभद्रा चौधरी,यादव फालक, प्रमिला पाटील,वसंत गाजरे,शोभा ढाके,प्रल्हाद बोरोले,मंगला फेगडे,महेश चोपडे,खालीदा शेख,खेमा बोंडे,शोभा पाटील,रमेश बोंडे, कविता पाटील,विजय देशमुख,सुमन ढाके,यशवंत नेहते,सुमन चौधरी,विलास बेंडाळे,पद्माबाई बोरसे,लता चौधरी, देविदास फिरके,कमल महाजन,मधुकर भिरुड,बाळू नेमाडे आदी ठेवीदारांनी आंदोलनात सहभाग घेतला.
पहा : जनसंग्राम संघटनेच्या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ.