मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुक तोंडावर असतानाच जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडलेत आणि त्यांनी परत एनडीएसोबत गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीतीश कुमार यांच्या आघाडीतून बाहेर पडल्यामुळे इंडिया आघाडीच नाहीतर जेडीयूचे अनेक नेतेही नाराज झाले. अशातच महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला रामराम करणार असून आजच नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे.
नीतीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर कपिल पाटील नाराज असून त्यांनी जेडीयूला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच आजच नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आहेत.
जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव व आमदार कपिल पाटील यांनी दिला राजीनामा
1 year ago
No Comments