भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हे ( पानाचे ) येथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावामध्ये स्वयंस्फूर्तीने शनिवारपासून तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार , ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, माजी उपसरपंच डॉ. टी . टी. बारी , उत्तम काळे , माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे , ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर वराडे , सुनील बारी , राजू भगत , विलास चौधरी , गोकुळ वराडे , डॉ. संदीप टोगळे यांच्यासह काही नागरिक व मित्र मंडळ यांनी बैठक घेऊन गाव शनिवार , रविवार व सोमवार असे तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
बंद मधून दवाखाने , मेडिकल , पिठाच्या गिरण्या , दूध डेअरी व कृषी केंद्र यांना वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गावात टॅंकरद्वारे फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी गाव बंदच्या निर्णयामध्ये सहभागी व्हावे , असे आवाहन करण्यात आले आहे.