जामनेरात १० उमेदवार रिंगणात; दोन मातब्बरांमध्ये लढत रंगणार !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २२ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून १० उमेदवार निवडणूक मैदानात असून खरी लढत भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री गिरीश महाजन व महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे यांच्यात होणार आहे.

जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतली असून १० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामध्ये दिलीप बळीराम खोडपे, (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट) गिरीश दत्तात्रय महाजन, (भारतीय जनता पार्टी) विशाल हरिभाऊ मोरे, (बहुजन समाजवादी पार्टी) अण्णासाहेब रामचंद्र राठोड, ( हिंदू समाज पार्टी ) प्रभाकर पंढरी साळवे, (राष्ट्रीय समाज पक्ष) मदन शंकर चव्हाण, (भारतीय जन सम्राट पार्टी) अनिल रंगनाथ पाटील, (अपक्ष) दिलीप मोतीराम खामनकर, (अपक्ष) राजेंद्र सुभाष खरे, (अपक्ष) राहुल राय अशोक मुळे, (अपक्ष) आधी उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

एकूण १२ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामध्ये आत्माराम सुरसिंग जाधव, ज्ञानेश्वर गोपीचंद चव्हाण, जितेंद्र पांडुरंग पाटील, जितेंद्र श्रावण पाटील, दीपक सिंह, शांतीलाल राजपूत, नितीन स्वरूपचंद नाईक, परवेज आलम, अब्दुल रशीद शेख, पुना पुंडलिक शेजुळे, प्रशांत भीमराव पाटील, मोहम्मद समीर युनूस खान, हुसेन युसुफ तडवी आदींनी माघार घेतली आहे. जामनेर विधानसभेसाठी खरी लढत भारतीय जनता पार्टीचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांच्यामध्ये होणार

Protected Content