Home Cities जामनेर जामनेर येथील विठ्ठल पाटलांकडून पुरग्रस्तांसाठी कपड्यांची मदत

जामनेर येथील विठ्ठल पाटलांकडून पुरग्रस्तांसाठी कपड्यांची मदत


jamner 2

जामनेर प्रतिनिधी । शहरातील वाकीरोड भागातील माऊली टी व मठ्ठा सेंटरचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शेळके पाटील यांनी कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून नवे जिन्स पँन्ट, शर्ट खरेदी करून ते पाळधीचे माजी सरपंच यांच्या सोबत कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी आज पाठविण्यात आले.

विठ्ठल शेळके पाटील हे नेहमीच मदतीचा हात म्हणून मदत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. वर्षातून अनेक वेळा गोरगरीब विदयाथ्यांना शाळेचे कपडे, कुष्ठरोगी महीला व षुरूषांना नवीन कपडे व साड्या वाटप करीत असतात. सामान्य कुटुंबात जन्मलेले असामान्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. कुठल्याही सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात विशेष मदत करण्यासाठी त्यांची वर्णी असते. समाजासाठी काहीतरी देणे लागते म्हणून ते मदतीस तयार असतात.


Protected Content

Play sound