जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी विलास राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांगली ताकद असून देखील गेल्या दोन वर्षांपासून तालुकाध्यक्षपद रिक्त होते. अखेर या पदावर विलास राजपूत यांची वर्णी लागली असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, पक्षाला यश मिळवून देण्याचे आव्हान विलास राजपूत यांच्या समोर राहणार आहे. ते आधी मनसेमध्ये होते. ज्येष्ठ नेते संजय गरूड यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादीत आले असून आता त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे.