जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १८ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवारी २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पिडीत तरूणी ही घरी एकटी असतांना गावात राहणारा सुरेश रामदास भील याने तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी हा पसार झाला. पिडीत तरूणीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी सुरेश भील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे हे करीत आहे.