वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेची जामनेर तालुका कार्यकारिणी घोषीत

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी २३ फेब्रुवारी रोजी जामनेर तालुक्याची कार्यकारिणी निवड करण्यात आली.

जामनेर तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी बन्सीलाल चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी महेंद्र नाईक यांची निवड झाली आहे. सचिवपदी खेमराज नाईक, कार्याध्यक्षपदी रमेश चव्हाण, सहसचिवपदी जितेंद्र नाईक, प्रसिद्धी प्रमुखपदी तुकाराम राठोड आणि खजिनदारपदी चिंतामण रणजीत राठोड यांची निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कायदेशीर सल्लागार म्हणून प्रदीप जाधव, ज्येष्ठ सल्लागार प्राध्यापक इंदल जाधव, पुखराज पवार, गणेश राठोड यांची निवड झाली आहे. तसेच सदस्य म्हणून राजेंद्र नाईक, प्रकाश चव्हाण, चिंतामण राठोड, वसंत पवार, मेहराम जाधव, अशोक पवार, वसंत पवार, सुखदेव चव्हाण, वामन जाधव आणि छगन चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा पदाधिकारी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष बीबी धाडी सर, सहसचिव रोहिदास पवार, प्रसिद्धी प्रमुख भारमल भाऊ नाईक, पांडुरंग पवार आणि अमरसिंग राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेमराज नाईक यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली.

<p>Protected Content</p>