जामनेर प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या विशेष सभेत तीन नवीन स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
येथील नगरपालिकेची विशेष सभा पालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी स्वीकृत सदस्य म्हणून हेमंत वाणी, भगवान सोनवणे आणि अब्दुल कासीम अब्दुल नबी यांची नावे जाहीर केली.
नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांनी तिघा नवीन स्विकृत सदस्यांचा सत्कार केला. उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, नगरसेविका मंगला माळी, किरण पोळ, शितल सोनवणे, बांधकाम सभापती संध्या पाटील, आतिष झाल्टे, नाजीम शेख, रिजवान शेख, बाबुराव हिवराळे, ज्योती सोन्ने-पाटील, कैलास नरवाडे आदी उपस्थित होते.