जामनेर प्रतिनिधी । शहराच्या हद्दीत असणार्या तालुका क्रीडा संकुलास नगरपालिकेच्या ऑनलाईन या प्रकारात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
जामनेर नगरपालिकेची यंदाची शेवटची सर्वसाधारण सभा ऑनलाईन या प्रकारात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या. यात तालुका क्रीडा संकुलाला मान्यता देण्यात आली हे क्रीडा संकुल राशीभूशी- कडबा बरडी परिसरात उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, या सभेत कचरा डेपोवर वाहुन नेणे, सांडपाणी, गटारींची साफसफाई कामास मुदतवाढ देणे, विजेचे खांब, पथदिवे, प्रमुख रस्त्यांची कामे; गाळा ताब्यात घेणे, सार्वजनिक शौचालय व सेफ्टी टँक व गटार बांधणे आदी विषयांना या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या सभेला मुख्याधिकारी राहुल पाटील, उपनगराध्यक्ष अनीस शेख, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, संध्या पाटील, प्रा. शरद पाटील, मंगलाबाई माळी, उल्हास पाटील, नाजीम शेख, रिजवान शेख, शीतल सोनवणे, आतीष झाल्टे, रतन गायकवाड, किरण पोळ, बाबुराव हिवराळे, कैलास नरवाडे, अनुसयाबाई सुरवाडे, फारुख मन्यार, खलील शेख, लीना पाटील आदी नगरसेवक तसेच सहायक मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कार्यालयीन प्रमुख ईश्वर पाटील, दत्ता जोहरे, संदीप काळे आदींची उपस्थिती होती.