जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सकल मराठा समाजाच्या वतीने वधू-वरांचा परिचय मेळावा शहरात येत्या २५ फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे. या मेळाव्याला वधूवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
शहरातील भुसावल रोडवरील विशाल लाज येथे सदर मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत बोलताना सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष दिलीप खोडपे, उपाध्यक्ष शंकर मराठे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत उद्योजक श्रीराम पाटील, राम पाटील, प्राध्यापक शरद पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, डी. एन चौधरी, विश्वजीत पाटील, प्रदीप गायके, राहुल चव्हाण यांच्यासह मराठा समाजातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी या मेळाव्याला सुमारे २५ हजार समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. या वधू- वर परिचय मेळाव्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मराठा समाजातील पदाधिकारी व नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. सदर मेळाव्यासाठी छावा संघटना, मराठा सेवा संघ, मराठा प्रीमियर लीग, जिजाऊ ब्रिगेड, युवक महासंघ, रयत सेना, संभाजी ब्रिगेड, छत्रपती ब्रिगेड या विविध संघटनांच्या सहकार्य लाभणार आहे.