जामनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जामनेर शहरात मंगळवारपासून चार दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. आ. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत याचा निर्णय घेण्यात आला.
जामनेरात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून चाचणी केलेल्या रुग्णांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. ही परिस्थिती पहाता मंगळवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय रविवारी आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेत घेण्यात आला.
जामनेरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या आठ दिवसांत तालुक्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून चाचणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. ही परिस्थिती आटोक्यात यावी यासाठी उपाययोजना म्हणून
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जामनेर तहसील कार्यालयात आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. यात सकाळी व सायंकाळी केवळ दोन तास डेअरी, दिवसभर रुग्णालय व मेडिकल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, तहसीलदार अरूण शेवाळे, मुख्याधिकारी राहुल पाटील, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, माजी नगराध्यक्ष राजू बोहरा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Jamner : Four Days Janta Curfew Declared In Jamner City