जामनेर प्रतिनिधी | जिल्ह्यात कोविडच्या आपत्तीमुळे जमावबंदी लागू असतांनाही मोर्चा काढून आंदोलन केल्याप्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाचा गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. कोरोनामुळे जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना जामनेरात मोर्चा काढल्याप्रकरणी आमदार गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस स्थानकात दाखल फिर्यादीनुसार आमदार गिरीश महाजन यांच्यासह उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बाबूराव घोंगडे, गोविंद अग्रवाल, तुकाराम निकम, महेंद्र बाविस्कर, नामदेव मंगरूळे, शेख अनीस, शेख नाजीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.