जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी ते नाचणखेडा गावांच्या दरम्यान एस.टी. बस पलटी होऊन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आज सायंकाळच्या सुमारास जामनेर होऊन एसटी बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली पाळधी- नाचनखेडा गावादरम्यान वाघुर नदीच्या पुलावर नाचनखेडा कडे जात असताना एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार पाळधी-नाचणखेडा रस्त्यावर वाघूर नदीच्या पुलावर एमएच१४ बीटी-२०७७ ही जामनेर डेपोची जामनेर ते जोगलखेडा ही बस संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पलटी झाली. यामध्ये प्रवाशीसह शाळेचे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. समोरून येणार्या दुचाकी स्वराला वाचाविण्याचा बस चालकाने प्रयत्न केल्याने बस ही रस्त्याच्या कडेला उलटी झाली. या बसचे वाहक बाला सैतवाल आणि वाहक अमोल पाटील यांनी गाडीतून प्रवाशी व विद्यार्थी यांना बाहेर काढले. या अपघातात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात येत आहेत.
यावेळी पाळधी येथील समाजसेवक कमलाकर पाटील, विश्वजित पाटील, अजय राजपूत, नाना पाटील यांच्यासह परिसरातील लोकांनी बचाव कार्यासाठी सहकार्य केले. या घटनेची माहिती पहूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तर जामनेर डेपोचे मॅनेजर कमलेश धनराळे हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले.