Home Cities जामनेर जामनेर येथे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

जामनेर येथे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

jamners
jamners


jamners

जामनेर( प्रतिनिधी)। तालुक्यातील चिंचोली पिंप्री ग्रामपंचायत येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील महात्मा बसवेश्वर यांची ८८८ वी जयंती प्रतिमापुजन करून संपन्न झाली. याप्रसंगी चिंचोली पींप्री सरपंच विनोद चौधरी, पोलीस पाटील वसंत लोखंडे उपसरपंच जगदीश वाणी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या कार्या विषयी माहिती देऊन महापुरुषांचे विचार समाजासाठी कसे पूरक आहे. हे आपल्या विचारातून लोखंडे यांनी व्यक्त करून जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गजानन वाणी यांनी देखील आपल्या मनोगतात महात्मा बसेश्वर यांच्या कार्याची महती विशद करून सर्वांचे आभार व्यक्त केले. गावकरी समाज बांधव ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्वांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound