यावल (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांची बोदवड तालुका निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा काँग्रेस भवनात संपन्न झालेल्या बैठकीत पटेल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांच्या हस्ते डॉ. उल्हास पाटील, (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) डी.जी.पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड .संदीप पाटील, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब पाटील, राजीव पाटील यांच्यासह आदी जिल्ह्यातील पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
तसेच बैठकीत जमील शेख,अविनाश भालेराव, एनएसयुआय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, एरंडोल नगराध्यक्ष योगेश महाजन, यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिरभाई खान, सद्दामभाई शाह,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, शामरावभाऊ पाटील,आणि जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष सर्व नवनिर्वाचित निरीक्षक आणि विधासभा उपाध्यक्ष उपस्थित होते.