
crime bedya
जळगाव प्रतिनिधी । शहरातील निवृत्तीनगर मंदिरासमोर पार्कीग केलेली कार अज्ञात चोरटयांनी पळवून नेल्याची घटना बुधवारी रात्री मध्यरात्रीनंतर घडली. गुरूवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंप्राळा परिसरातील जिल्हा बँक कॉलनी येथे मुकेश भालेराव पाटील (39) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा टूर अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. पाटील यांनी त्यांच्या मालकीची सुमारे बारा लाख किंमतीची कार (क्रमांक एम.एच. 19 बी.यू. 5949) नेहमीप्रमाणे निवृत्तीनगरातील पंचायतन मंदिरासमोर गट नं.21/22 प्लॉट क्रमांक 17 येथे मोकळया जागेत बुधवारी पार्किंग केली. गुरुवारी सकाळी निवृत्तीनगरातील रहिवासी भटू चव्हाण यांना कार नसल्याचे दिसून आले. चव्हाण यांनी हा प्रकार गाडीमालक मुकेश पाटील यांना कळविला. पाटील व चव्हाण यांनी परिसरात व शहरात कारचा शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.