जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मील परिससरातील माहेर असलेल्या विवाहितेला हुंडा हिला नाही म्हणून छळ करून जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह तीन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मील परिसरातील माहेर असलेल्या शयाना अम्मार शेख (वय-२३) रा. बहादरपूर शिरसोदे ता. पारोळा यांचा विवाह अम्मार शेख अन्वर शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसातच पती अम्मार शेख याने विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. लग्नात हुंडा दिला नाही आणि शेतात काम करता येत नाही असे हिनवून शिवीगाळ मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सासू व माम सासरे यांनी शारिरीक व मानसीक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. शहर पोलीस ठाण्यात विवाहितेने तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अम्मार अन्वर शेख, सासू नाजेमाबी अन्वेर शेख आणि माम सासरे सादीक शेख रजाक शेख सर्व रा. बहादरपूर शिरसोदे ता. पारोळा जि.जळगाव यांच्याविरोधात २६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील करीत आहे.