जळगाव प्रतिनिधी । आशा फाउंडेशन आणि रोटरी परिवार आयोजित डॉ. किशन काबरा लिखीत “Emotional Growth” आणि “स्वर्ग हवाय कुणाला?” या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळा शहरातील कांताई सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक, लेखक डॉ.किशन काबरा, प्रमुख वक्ते म्हणून ठाणे येथील सुप्रसिद्ध वक्ते जयप्रकाश काबरा, अनुवादक अशोक जोशी आणि रोटरीचे राजेश पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी रोटरीचे राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. काबरा यांच्याहस्ते प्रकाश पाठक यांचा सत्कार, राजेश पाटील यांच्याहस्ते जयप्रकाश काबरा यांचा आणि उद्योजक डॉ. किशन काबरा यांचा प्रा.प्रकाश पाठक यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर “Emotional Growth” आणि “स्वर्ग हवाय कुणाला?” या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळा शहरातील कांताई सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
उद्योजक डॉ. किशन काबरा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, जीवन समजावून घ्यायचे असेल तर मागे बघा आणि प्रगती करायचे असेल तर सतत पुढे बघा, काम करतांना पैशांना महत्व न देता कामगार, मजूर याची अधिक काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे मी अाज मोठा उद्योजक बनलो आहे. यासाठी माझ्या परिवार यांचा मोठे पाठबळ मिळाले.