जळगाव प्रतिनिधी । शहरासह परिसरात मुस्लिम बांधवांतर्फे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, समाज बांधवांतर्फे विश्वशांतीसह पूरग्रस्तांसाठी नमाज पठण करण्यात येवून एकमेकांना आलिंगन देत ईदचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
सुन्नी ईदगाह मैदान येथे सकाळी ९ वाजता सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर याठिकानी मौलाना जाबीर रजा रजवी यांच्या नेतृत्वाखाली नमाजे ईद उल अजहा(बकरी ईद)ची नमाज आदा करण्यात आली. या प्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविक करत सर्वांनी कायद्यकह्या चौकटीत राहून ईद साजरी करावी, कोणाच्याहई धार्मिक भावना दुखविल्या जाणार नाही याचई दक्षता घ्यावी, देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करावे असे आवाहन केले.
नमाजची पध्दत मौलाना नजमुल हक मिस्बाही यांनी सांगितली. सलातो सलाम मौलानआ अब्दुल मोमीन यांनी म्हटले. कुतबा व बयान मौलआना जाबीर रजा यांनी म्हटले. या प्रसंगी नजमूल हक यांनी दुआ करतांना विश्वशांती, देशाची प्रगती, नौसर्गिक आपत्ती पासून सर्वांचे रक्षण करत स्दुख समृध्दीसाठी प्रार्थना केली. प्रसंगी सै. अयाज अली नियाल आली, मौलान जाबीर रजा रजवी, मौलाना मतईन रजवी, मौलाना अलीम रजा, मौलाना हाजी मुख्तार शाह, शेख युसूफ, उमर खान, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.