जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला असून याची मतमोजणी उद्या होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे १२३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची धामधुम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. यंदा देखील लोकनियुक्त सरपंचपद असल्याने अनेक ठिकाणी चुरस निर्माण झाली होती. यात जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांचा समावेश असल्याने डिसेंबरमध्येच राजकीय वातावरण तापले होते. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावल्या होत्या.
दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर, उद्या सकाळी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे.