जळगावात मतदारांना सेल्फीचा मोह आवरेना

jalgaon

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जळगाव पीपल्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि सेंड जोसेफ या दोन्ही शाळेतील सखी मतदान केंद्रात विधानसभा मतदानाबाबत महिलांचा व तरुणाईचा उत्साह वाढवण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. याठिकाणी अनोख्या पद्धतीने प्रत्येक मतदाराचे स्वागत केले जात होते. मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंटवर जाऊन मतदारांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून सर्व मतदान केंद्रावर मतदारांची मतदानासाठी कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र दुपारी 1 वाजेनंतर मतदारांचा मतदानासाठी गर्दी वाढत होती. आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिमझिम हजेरी लावली होती त्यामुळे मतदानासाठी सकाळी मतदारांचा निरुत्साह दिसून येत होता. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल झाल्यानंतर नागरिकांनी दुपारनंतर मतदान करण्याचे पसंत केले. जळगाव जिल्ह्यात आज सकाळी ११ वाजेपर्यंत 14.36 टक्के मतदान झाले.

Protected Content