जळगाव प्रतिनिधी | पोलीस प्रशासनाच्या पाठोपाठ जिल्ह्यातील महसूल अधिकार्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हा महसूल प्रशासनातील बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात वरिष्ठ पातळीवरील एका पदाची खांदेपालट करण्यात आली आहे. महसूल प्रशासनचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची पुनर्वसन उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची महसूल उपजिल्हाधिकारीपदी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.
यासोबत जिल्ह्यातील नायब तहसीलदारांच्या देखील बदल्या झाल्या आहे. यात जळगाव तहसील कार्यालयातील निवडणूक तहसीलदार एल.व्ही. कोसोदे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत शाखा नायब तहसीलदारपदी बदली झाली आहे. याशिवाय, जळगाव उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार प्रीती लुटे यांची भुसावळ उपविभागीय कार्यालयात, चाळीसगाव तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार विशाल नगराज सोनवणे यांची जळगाव तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदाराच्या रिक्तपदी, अक्राणी (जि.नंदुरबार) येथील नायब तहसीलदार राहुल मुळीक यांची पारोळा निवासी नायब तहसीलदारपदी, अक्राणी येथील तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार अमोल पाटील यांची अमळनेर येथे निवासी नायब तहसीलदारपदी, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांची पुणे महसुली विभागात महसूल नायब तहसीलदार शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथे बदली करण्यात आली आहे.
उर्वरित बदल्यांमध्ये चाळीसगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डी.एस.भालेराव यांची एरंडोलला संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार म्हणून, साक्री येथील निवासी नायब तहसीलदार अंगद भागवत आसटकर यांची निवडणूक नायब तहसीलदार भुसावळ येथे रिक्त पदावर, अक्कलकुवा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार राहुल नागराज वाघ यांची जळगाव तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार पदावर बदली करण्यात आली आहे. याबाबतचे शासकीय आदेश काढण्यात आले आहेत.