Home Cities जळगाव ब्रेकींग: अभिजीत राऊत यांची बदली : अमन मित्तल नवीन जिल्हाधिकारी

ब्रेकींग: अभिजीत राऊत यांची बदली : अमन मित्तल नवीन जिल्हाधिकारी

0
61

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अमन मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने रात्री उशीरा वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अमन मित्तल हे येणार आहेत.

राज्य शासनाने रात्री उशीरा ४४ वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची देखील बदली करण्यात आली आहे. श्री. राऊत यांच्या कार्यकाळात जिल्हा प्रशासनाने केलेली कामे विशेष करून कोरोना काळातील कामे ही लक्षणीय ठरली होती. त्यांच्या जागी येणारे अमन मित्तल हे २०१४ सालच्या युपीएससीतील अधिकारी आहेत.


Protected Content

Play sound