जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील तीन गुन्हेगारांना पोलीस अधिक्षकांच्या निर्देशानुसार हद्दपार करण्यात आले आहे.
वाढलेल्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. शहरासह जिल्हाभरात या प्रकारची कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगाव शहरात देखील अशाच स्वरूपाची कारवाई करत तीन गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरीकांचे रक्षण व्हावे या हेतूने ही ही कारवाई जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आली आहे. विशाल मुरलीधर धाबाडे (२१), उदय रमेश मोची (१९), अभिषेक उर्फ बजरंग ’परशुराम जाधव (१९, सर्व रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव ) या तीन जणांना हद्दपार करण्यात आले आहे. या तिल्ही गुन्हेगारांविरूष्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या तिघांचा हह्पपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात आली.
या चौकशीनंतर जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढून तिन्ही गुन्हेगारांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.