जळगाव प्रतिनिधी | रस्त्याच्या कामाच्या निविदेच्या वादातून पारोळा येथील कंत्राटदाराला मारहाण करत धमकावल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, गुरुवारी पारोळा तालुक्यातील राज्यमार्गाची निविदा उघडणार होती. ही निविदा समीर यांच्यासह सचिन पी. सनेर यांनी भरली होती. त्यासाठी समीर वसंतराव पाटील हे त्यांच्या चारचाकीने (क्रमांक एएमच १९, बीयू- ३३००) जळगाव येथीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गुरुवारी आले होते. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जळगाव येथील राहुल शांताराम सोनवणे याच्यासह सात ते आठ जणांचा जमाव समीर यांच्या गाडीसमोर येऊन शिवीगाळ केली. यानंतर राहुल सानेवणे याने सनेर यांना फोन करून पुन्हा समीर यांना शिवीगाळकरत धमकावले. याप्रकरणी समीर पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल सोनवणेंसह सात ते आठ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, समीर वसंतराव पाटील हे आमदार चिमणराव पाटील यांचे पुतणे असून पारोळा येथील राज्य मार्गाच्या निविदेवरून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.