जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मानराज पार्क येथे भरधाव वेगाने येणार्या डंपरने जोरदार धडक देऊन वकिलास चिरडल्याची घटना आज घडली आहे, अपघाताच्या नंतर नागरिकांनी पाठलाग करून डंपर पकडला परंतु चालक हा वाहन सोडून पसार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव येथील रहिवासी ऍड. विवेक प्रकाश पाटिल (वय-३५) जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. जळगाव ते धरणगाव दुचाकी (एमएच १९ सीएच १३९६) ने अपडाऊन करुन त्याचे कामकाज सुरु असते. गुरुवारी २३ मार्च रोजी नेहमी प्रमाणे विवेक पाटील हे जळगावी आले होते. कामाच्या व्यापामुळे उशिर होवुन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने घराकडे (धरणगाव) येथे निघाले. जळगाव शहरातील मानराज पार्क जवळून दुचाकी ने जात असताना समोरून येणार्या भरधाव डंपरने (एमएच ०४ एचएस २०१४ ) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रोडवर पडल्यानंतर ट्रकने त्यांना चिरडले.
दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव शहरात राहणारे मित्रपरिवार व वकील सहकारी यांनी एकच गर्दी केली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयत विवेकच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. मयत ऍड. विवेक पाटिल यांच्या पश्चात सहामहिन्याची मुलगी, पत्नी आणि आई असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. यातून रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.