जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच तडकाफडकी बदली झालेल्या डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीस स्थगिती मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच डॉ. विद्या गायकवाड यांची अचानक बदली झाली होती. त्यांच्या जागी परभणी येथून देविदास पवार आले होते. काल सकाळी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार देखील स्वीकारला होता. दरम्यान, अवघ्या सात महिन्यात आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्याने डॉ. विद्या गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवाद म्हणजेच मॅटमध्ये धाव घेतली होती.
दरम्यान, डॉ. विद्या गायकवाड यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यात त्यांच्या बदलीस दिनांक ९ डिसेंबर २०२२ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तर, याची माहिती मिळताच दुपारीच देविदास पवार हे सुटी टाकून परगावी निघून गेले आहेत. अर्थात, आता पुढील दहा दिवसांपर्यंत डॉ. विद्या गायकवाड याच आयुक्त राहतील हे स्पष्ट झाले आहे.