
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बळीराम पेठेतील एक दुकान फोडून चोरट्यांनी २५ हजाराची रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, बळीराम पेठेत मयूर कुकरेजा यांचे ओम स्पोर्ट्स एनएक्स नावाचे क्रीडा वस्तूंचे दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमी प्रमाणे कुकरेजा हे दुकान बंद करून घरी गेले. परंतू आज (गुरुवार) सकाळी १० वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता. त्यांना दुकानाचे मुख्य शटरचे कुलूप तोडलेले दिसले. दुकानात जाऊन बघितले असता, सर्व सामान अस्त्यव्यस्थ फेकलेला होता. तर गल्ल्यातील २५ हजाराची रोकड गायब होती. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या संदर्भात कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.