जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक : ११ उमेदवारांमध्ये लढत रंगणार

धरणगाव-अविनाश बाविस्कर । जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या १७ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तर आता निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांसह इतर राजकीय पक्षाचे एकूण ११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याची माहिती जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकार व कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापैकी अनिता सुनील सोनवणे, निलेश सुरेश चौधरी, रियाज सादिक देशमुख, प्रतापराव गुलाबराव पाटील, योगेश एकनाथ कोळी, मुकेश मूलचंद कोळी या ६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता रिंगणात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून गुलाबराव देवकर, मनसेचे मुकुंदा आनंदा रोटे, हिंदुस्थान जनता पार्टीचे किशोर मधुकर झोपे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण जगन सपकाळे, तर अपक्ष म्हणून गुलाबराव रघुनाथ पाटील, प्रसाद लीलाधर तायडे, भगवान दामोदर सोनवणे, भरत देवचंद पाटील, शिवाजी महाराज हटकर आणि सोनी संतोष नेटके अशा ११ जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.

Protected Content