जळगाव प्रतिनिधी । रिक्षाने घरी परतणाऱ्या रिक्षा चालकावार चॉपरने हल्ला करणाऱ्या चौघांना शनीपेठ पोलीसांनी मध्यरात्री अटक केली आहे. चौघांना आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संशयित आकाश मुरलीधर सपकाळे, गणेश रविंद्र सोनवणे, दिपक सुकलाल सोनवणे तिघे रा. कांचननगर व गणेश दंगल सोनवणे रा. वाल्मिक नगर या चौघांना शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. वाल्मिकनगर येथील दिपक गंगाराम सोनवणे (कोळी) हे रिक्षाचालक असून वासुदेव रामकृष्ण सोनवणे आिाण भिमराव भास्कर कोळी दोन्ही रा. कांचन नगर या दोन मित्रांसोबत रात्री 12 वाजेच्या सुमारास जेवणासाठी रिक्षाने शेतात गेले होते. जेवन करून स्वयंपाकाचे भांडे रिक्षात टाकून घरी येत असतांना रात्री 1 वाजेच्या सुमारास कांचननगरातील उज्ज्वल चौकात संशयितांनी चालत्या रिक्षात बसलेले वासुदेव सोनवणे यांच्या कानशिलात मारली. याचा जाब रिक्षाचालक दिपक सोनवणे याने विचारल्याने राग येवून संशयितांनी सोनवणे यांच्यावर चॉपरने वार करुन जखमी केले. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिपेठ पोलीस ठाण्यात दिपक सोनवणे यांच्या जबाबावरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताबाबत गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंग पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली हकीम शेख, परीस जाधव, संजय शेलार, अमोल विसपुते, अनिल कांबळे, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, किरण वानखेडे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकासह चौघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.