जळगाव प्रतिनिधी | राशी सीडस या अग्रगण्य कंपनीने जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूरांना थेट त्यांच्या गावात जाऊन आरोग्यविषयक सुविधा प्रदान करण्यासाठी रूग्णवाहिकेत फिरता दवाखाना तयार केला असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.
राशी सीडस ही कंपनी बियाण्यांसाठी ख्यात आहे. ही कंपनी सीएसआरच्या अंतर्गत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. या अनुषंगाने आजपासून जळगाव जिल्ह्यासाठी मोबाईल हेल्थ चेकअप व्हॅन सेवेत रूजू करण्यात आली आहे. यात विविध विकारांचे निदान आणि यावर उपचार करण्यात येणार आहेत. या व्हॅनमध्ये एक एमबीबीएस डॉक्टर राहणार असून ते चेकअप करून उपचार करतील. या तपासणीत कुणी गंभीर व्याधीचा रूग्ण आढळून आल्यास त्याला पुढे जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात येईल.
आज अजिंठा विश्रामगृहातील आवारात या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिव्हील सर्जन डॉ. एन.एस. चव्हाण, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, क्रांती ट्रेडर्सचे प्रमोद पाटील यांच्यासह राशी सीडसचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने डिव्हिजनल बिझनेस मॅनेजर सुनील महाजन, रिजनल बिझनेस मॅनेजर अखिल प्रताप सिंग, डॉ. रोहित बोथरा, रिजनल क्रॉप मॅनेजर गोपाल पाटील यांचा समावेश होता. प्रास्ताविक-सूत्रसंचालक आणि आभार समाधान धनगर यांनी केले.
राशीच्या समाधान धनगर यांनी प्रास्ताविकातून या व्हॅनमध्ये असणार्या सुविधांची माहिती दिली. तर पालकमंत्र्यांनी फित कापून याचे लोकार्पण केले. यानंतर ना. गुलाबराव पाटील यांचा रक्तदाब मोजून या व्हॅनचे कार्य सुरू झाले. याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी राशी सीडसच्या या समाजउपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, राशी कंपनीने शेतकरी आणि शेतमजूरांना थेट त्यांच्या गावात तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबत कंपनीने दोन गावांमध्ये पाण्याचे प्लांट देखील सुरू केले आहेत. या सुविधांचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
खालील व्हिडीओत पहा लोकार्पण कार्यक्रमाचे लाईव्ह कव्हरेज.
https://www.facebook.com/508992935887325/videos/179085217617850