जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह त्यांची पत्नी व वडीलांविरुद्ध रामानंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू आरोपींना दोन दिवसानंतरही अटक करण्यात आलेली नाहीय. यावर वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच आरोपींच्या अटकेबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया तपास अधिकारी सपोनि सचिन बेंद्रे ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली आहे.
या संदर्भात अधिक असे की, लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह त्यांची पत्नी व वडीलांविरुद्ध रामानंद पोलीस स्थानकात एका पिडीत तरुणीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन देखील आरोपीला अटक न झाल्यामुळे यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय देखील पिडीतेने व्यक्त केला होता. या संदर्भात पोलिसांची भूमिका जाणून घेतली असता. प्रतिक्रिया तपास अधिकारी सपोनि सचिन बेंद्रे यांनी सांगितले की, सर्वातआधी पिडीत तरुणीची वैद्यकीय तपासणी महत्वाची आहे. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. तसेच संबंधित पिडीत तरुणीची फिर्याद घेण्यासाठी महिला अधिकारी गरजेची असते. त्या रात्री महिला अधिकारी ड्युटी संपून घरी गेल्या होत्या. तरी देखील त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यामुळे महिला अधिकार पोलीस स्थानकात येतील इतकाच विलंब फिर्याद घेण्यास झाला, असे देखील श्री. बेंद्रे यांनी सांगितले.