जळगाव प्रतिनिधी । जळगाव पोलीस वसाहतीत अत्याधुनिक सर्व सुविधांयुक्त चार खोल्याचे 924 घरे लवकरच पोलिस वसाहतीत प्रत्यक्षात साकारणार आहे. सात मजली अशा 23 इमारती उभ्या राहणार असून एका इमारतीत 42 घरे तसेच लिफ्ट ची सुविधा अशा प्रकारे मंजुर एकूण 924 घरांपैकी पहिल्या टप्प्यात मुंबई गृहनिर्माण सोसायटीतर्फे 252 घर उभारणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलीस दलाकडून नवीन निवासस्थानांसाठी पाठपुरावा सुरु होता. मात्र या कामासाठी निधीला मंजुरी मिळाली नव्हती. अखेर 62 कोटी 45 लाखांच्या या कामासाठी निधीला गेल्या काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये या घरांच्या बांधकामासाठीची प्रक्रियाही राबविण्यात आली होती. निविदा प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर सर्व कागदोपत्री पार पडली आहे. लवकरच या जागेचा मुख्यमंत्र्याचे हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडणार त्यानंतर मुंबई येथील गृहनिर्माण सोसायटीमार्फत या घरांचे बांधकाम केले जाणार आहे.
50 चौमीटर याप्रमाणे एक खोली असे दोन बेड रुम, एक किचन व एक हॉल अशा चार खोल्या राहतीत. सात मजली इमारत प्रत्येक इमारतील 42 घरे अशा एकूण 23 इमारती उभारल्या जातीत. प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा राहणार आहे. चांगल्या दर्जाचे साहित्यांचा बांधकामासाठी वापर होणार आहे. 924 कर्मचार्यांसाठी तसेच 56 अधिकार्यांसाठी अशी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. 18 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी वसाहतीतील एकूण 800 घरांपैकी 150 घरेही पाडले जाणार आहेत. केवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनानंतर कामाला वेग येणार आहे. प्रत्यक्षात कामासाठी कंपनीमार्फत संबंधित ठिकाणी शुक्रवारी साहित्य आणण्यात आले असून बांधकामाच्या साहित्यांसह मजुरांसाठी मंडप उभारण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
वसाहतीत मंजुर घरासोबत वसाहतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस उपविभागीय कार्यालय, एम.टी.सेक्शन, श्वान पथक, बीडीडीएस या विभागांचे नुतनीकरणासह बांधकाम केले जाणार आहे. तसेच विभागातील गाड्यांसाठी म्हणजेच 100 गाड्या उभ्या राहतील अशा प्रकारचे भव्य शेडही उभारले जाणार आहे. अनेक वर्षापासून नुतनीकरणाचे प्रतिक्षेत असलेल्या कार्यालये कात टाकणार आहे.