जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल घेण्यासाठी गेलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सागर पुंडलिक गोसावी (वय-23) रा.चिंचोली ता.जळगाव हे शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल घेण्यासाठी 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.45 वाजता गेले. मोबाईल घेण्याचे काम आटोपल्यानंतर परत पार्किंगला लावलेल्या दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र तपास करूनही दुचाकी मिळून न आल्याने शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक सोनवणे करीत आहे.