जळगाव । अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षा देण्यासाठी अडचणी येणार असल्याने याऐवजी असाईनमेंट पध्दतीत परिक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी एनएसयुआतर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे. त्यांनी आज याबाबत कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन सादर केले.
जळगाव आज जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पाटील यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतीने न घेता असाइनमेंट पद्धतीचा वापर करून परीक्षा घेण्यात याव्यात. ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये ऑनलाइन परीक्षा पद्धती अशक्य कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा ग्रामीण व आदिवासी भाग समाविष्ट होतो सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्यात येणार आहेत.
पूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरूंना परीक्षा कोणत्या पद्धतीने घेणार आहेत यासंबंधीचा निर्णय येत्या सात सप्टेंबर पर्यंत राज्यपालांकडे सुपूदर्र् करायचा आहे. त्या अनुषंगाने आज जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देऊ शकणार नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा न घेता असाइनमेंट पद्धतीचा वापर करून परीक्षा घेण्यात याव्या असाइनमेंट पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना विषयाशी संबंधित काही प्रश्नावली सोडवण्याकरता विद्यापीठाच्या मार्फत अन्यथा महाविद्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रश्नावली दिली जाईल. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या दिलेल्या कालावधीमध्ये प्रश्नावली महाविद्यालयाकडे ई-मेल द्वारे व्यवस्थित रित्या सोडून पाठवावी विद्यापीठाने ५० टक्के गुण विद्यार्थ्याने सोडविलेल्या प्रश्नावली होतो तसेच ५० टक्के गुण हे विद्यार्थ्यांच्या मागील सेमिस्टर च्या सरासरी गुण याच्या आधारे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राचा निकाल जाहीर करण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीमुळे ज्या काही अडचणींना सामोरे जावे लागेल असते त्या अडचणी येणार नाहीत. तसेच महाविद्यालय व विद्यापीठांना निकाल परीक्षा घेणे अतिशय सोयीस्कर रित्या पडेल. यासंबंधीची मागणी जळगाव जिल्हा एनएसयुआय च्या वतीने कुलगूरू यांच्याकडे करण्यात आली.
आज जळगाव जिल्हा एन एस यू आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कुलगुरू डॉ.पी.पी पाटील यांची भेट घेतली असता चर्चेदरम्यान कुलगुरू डॉ.पी.पी पाटील यांनी सांगितले की, ऑनलाईन पद्धती शक्य नसल्यास विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. ऑफलाईन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येऊन परीक्षा द्यावी लागणार. म्हणजेच एकीकडे महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी घेत विद्यार्थ्यांनी घरूनच परीक्षा देण्याची सुविधा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना करून देण्याचे आदेश देते व दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी पाटील हे मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करायला बसले आहेत.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये बोलून घेतल्या जळगाव जिल्हा एनएसयूआय च्या वतीने विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ह्या बंद पाडण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्या विद्यापीठ प्रशासनाचा आक्रमक पद्धतीने रस्त्यावरती उतरून निषेध करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, समन्वयक वैभव तराले, विवेक महाजन, रोहित मोरे, राहुल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1002538000191223/