जळगाव शहरात जनता कर्फ्यूस प्रारंभ; नियमांचे करा पालन !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर निर्णय घेतल्यानुसार आज रात्री आठ वाजेपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू झाला असून यासाठी आखून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जळगाव शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून सुरू होणारा हा कर्फ्यू दिनांक १५ मार्च रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. या अनुषंगाने आज रात्री आठ वाजेपासून जळगाव शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

सर्व निर्बंध जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी असून आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर त्यांची अंमलबजावणी नंतर करण्यात येईल. राज्यातील इतर भागातून होणारी प्रवासी वाहतूक सुरु राहील. टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनाची सेवा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी याचे वाहने आणि परीक्षार्थीं विद्यार्थ्यांसाठी राहील. हॉस्पिटल, ओपीडी व रुग्णवाहिका सेवा सुरु राहतील. सर्व प्रकारची रुग्णालये, औषधांची दुकाने सुरु राहतील. दुध खेरदी-विक्री केंद्रे, कृर्षी, आणि औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीने सुरु राहतील.

पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनासाठी सुरु राहतील. रेल्वे,&#विमानसेवा, मालवाहतुक सुरु राहील. तसेच कुरीयर,गॅरेज, वर्कशॉप, वृत्तपत्र, मिडीया सेवा,बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा,पशुखाद्य केंद्रे, पशुवैद्यकीय सेवा सुरु राहतील.

शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी क्लासेस, बाजारपेठेतील दुकाने बंद राहतील.सर्व प्रकारचे हॉटेल बंद राहतील, मात्र पार्सल सेवा सुरु राहील. किरकोळ भाजीपाला आणि फळ विक्री, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय ,खाजगी बांधकामे (मान्सून पूर्व कामे वगळून ) शॉपीग मॉल, मार्केट, किराणा दुकाने तसेच सर्व दुकाने, लिकर शॉप तसेच शॅाप, स्पा, सलून, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, नाट्यगृहे, क्रिडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन,आठवडी बाजार, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहील

Protected Content