Jalgaon जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| बांभोरी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री दुचाकीवर येणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने उडवल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पारधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोकुळ रामदास फुसे (वय-४०) रा. शिरसोली ता. जि. जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. गोकुळ फुसे हा कम्प्युटर इंजिनिअर असून खाजगी ठेकेदार घेऊन काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. याच कामाच्या निमित्ताने गोकुळ फुसे हा दुचाकीने नाशिक येथे गेला होता. नाशिकहून काम आटवून जळगावकडे परतत असताना सोमवारी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास बांभोरी गावानजीक अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला, दरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यासंदर्भात पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.