Home Cities अमळनेर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

0
40


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील धावडे येथे एका नराधमाने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना धावडे येथे घडली होती. यातील आरोपी गोकुळ एकनाथ पाटील याला मध्यरात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी क, धावडे येथे सुमारे सहा महिन्यांपूर्वी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी खाटेवर झोपली असताना गोकुळ एकनाथ पाटील याने घरात घुसून तिच्या तोंडावर रुमाल दाबून तिच्यावर अतिप्रसंग करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. ती बालिका ४ महिन्याची गर्भवती राहिल्याने जळगाव जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबत जिल्हा पेठ पोलिसांनी अमळनेर पोलिसांना अहवाल पाठवल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी गोकुळ एकनाथ पाटील विरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला तात्काळ मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या बलात्कार प्रकरणी तपास पी.एस.आय.चंद्रकांत चातुरे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound