जळगाव प्रतिनिधी । दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांमधून विमान, रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीद्वारे येणार्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असुन याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज काढले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला असल्याने राज्य सरकारने कालच काही राज्यांमधून येणार्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यालाच अनुसरून आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन निर्देश जारी केले आहेत. जिल्हाधिकार्यांनी जारी केलेले निर्देश हे जसेच्या तसे खाली दिले आहेत.
जिल्हयाकरीता लॉकडाऊन कालावधी ३० नोव्हेंबर, २०२० पावेतो वाढविण्यात आलेला असून लॉकडाऊन कालावधीत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. दरम्यान, दिनांक २५
नवेबर, २०२० पासून जळगांव जिल्हयात विमान, रेल्वे व रस्त्याने प्रवास करणार्या व्यक्तीवर निर्बंंध लागू करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत
अ) देशांतर्गत विमान वाहतुकीबाबत :-
१) देशांतर्गत विमानाद्वारे एनसीआर दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून नळगांव जिल्हयात प्रवास
करणार्या व्यक्तीना कोविड-१९ विषाणु संसर्गबावत चाचणी निगेटीव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. विमानपत्तन निदेशक, भारतीय विमानतळ प्राधिकरण जळगाव यांनी प्रवासी बोर्डींग करण्यापूर्वी सदरच्या चाचणीचा अहवाल तपासून खात्री करावी.
२) विमानाचे लँडीग होण्यापूर्वी ७२ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणी करीता नमुने घेण्यात यावेत.
३) ज्या प्रवाशांना चाचणी केल्याबाबतचा अहवाल नसेल अशा प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी स्वत:च्या खर्चाने करुन घेता येईल. विमानपत्तन निदेशक, जळगांव यांनी विमानतळावर चाचणी करण्याकरीता आरोग्य विभागाशी समन्वय साधून सेटअप उभारणी करण्यात यावी.
४) चाचणी केल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी विमानतळ प्राधिकरणाने द्यावी, तसेच विमानतळावर
चाचणी करणार्या प्रवाशांपैकी ज्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येतील अशा सर्व प्रवाशांचे संपर्क नंबर व पत्ता याबाबतची माहिती स्वतंत्ररित्या नोंदवहीमध्ये ठेवण्यात यावी.
५) ज्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह येईल त्यांचेबावतीत कोविड साठी असलेल्या
प्रोटोकॉलनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
६) वरील प्रमाणे सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी आयुक्त, जळगांव शहर
महानगरपालिका जळगांव यांनी एका अधिकार्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.
इ) रेल्वेद्वारे प्रवास करण्याबाबत :-
१) एनसीआर दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून सुटणार्या किंवा या राज्यात थांबा असणा-या रेल्वेद्वारे जळगांव जिल्हयात येणार्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी असणारा निगेेटीव्ह अहवाल सोबत वागवणे अनिवार्य राहील.
२) रेल्वेने महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वा ९६ तासांच्या आत चाचणीकरता नमुने घेण्यात आलेले असावेत.
३) ज्या प्रवाशांकडेस आरटीपीसीआर चाचणी केल्याबाबतचा अहवाल नसेल अशा प्रवाशांचे त्या त्या संबंधित रेल्वे स्थानकावर स्क्रिनींग करुन अन्य लक्षणांसाठी तापमान मोजण्यात यावे, यावावतची जयाबदारी रेल्वे विभागाची राहील.
४) लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहील.
५) लक्षणे असलेल्या प्रवाशांना इतरांपासून वेगळे करण्यात यावे व त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी.सदरच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास अशा प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहील.
६) जे प्रवाशी कोविड चाचणी करणार नाहीत किंवा पॉझिटीव्ह येतील अशा प्रवाशांना नियमानुसार जवळच्या
कोविड केअर सेंटरमध्ये भर्ती करण्यात यावे व त्याबाबतचा खर्च संबंधित प्रवाशांकडून वसुल करण्यात यावा.
७) जळगांव जिल्हयातील सर्व रेल्ये स्थानकांच्या बावतीत वर नमूद केलेप्रमाणे कार्यवाही होत आहे किंवा नाही
याची तपासणी करण्यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सीडंट कमांडर यांनी त्यांच्या स्तरावरुन प्रत्येक स्थानकासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नेमणूक करावी.
उ) रस्त्याने प्रवास करण्याबाबत :-
१) एनसीआर दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार्या प्रवाशांची स्क्रिनींग करुन तापमान मोजण्याकरीता परराज्याच्या सिमेशी संलग्न असलल्या व थेट जळगांव
जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार्या सर्व मार्गावर तपासणी पथकाची (२४ बाय ७) स्थापना करण्यावाबत
या कार्यालयाचे आदेश क्रमांक दंडप्र४०१/कावि । २०००३२९, दिनांक २७ जून, २०२० अन्वये संर्वीधत
तहसिलदार यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.
२) लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच जिल्हयात प्रवेश देण्यान यावा. ज्या प्रवाशांना लक्षणे आहेत अशा प्रवाशांना परत माघारी फिरुन त्यांच्या घरी परत जाण्याचा पर्याय असेल.
३) लक्षणे असलेल्या प्रवाशांना वेगळे करन त्यांची चाचणी करण्यात यावी व चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा राहीन.
४) जे प्रवाशी कोविड चाचणी करणार नाहीत किंवा वाधित आदळून आल्यास अशा प्रवाशांना नियमानुसार
जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये भर्ती करण्यात यावे व त्याचा खर्च संबंधित प्रवाशाकडून वसुल करण्यात यावा.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून
वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली या नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी
निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील असे यात म्हटले आहे.