जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आज सकाळी नॅक समिती दाखल झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नॅक समितीच्या पाहणी निमित्ताने जोरदार तयारी करण्यात आली होती. या अनुषंगाने आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समितीचे सदस्य विद्यापीठात दाखल झालेत. या समितीत पाच सदस्य असले तरी यातील चार सदस्यच पाहणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कुलगुरूंसह अन्य अधिकार्यांच्या उपस्थितीत समितीच्या सदस्यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर समितीने लागलीच विद्यापीठातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी सुरू केली आहे.
२३ ते २५ ऑगस्ट दरम्यान नॅक समिती विद्यापीठाला भेट देऊन तपासणी करणार आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि प्रशाळांची तयारी झाली आहे. यंदा विद्यापीठाचे हे चौथे पूनर्मूल्यांनक असणार आहे. सन २००१मध्ये विद्यापीठाला नॅककडून चार स्टार, सन २००९मध्ये बी ग्रेड प्राप्त झाली. सन २०१५मध्ये तिसर्या साखळीत ए ग्रेड प्राप्त झाली होता. आता समिती विद्यापीठाची पाहणी केल्यानंतर पूनर्मूल्यांकनाची ग्रेड जाहीर करणार आहे.