जळगाव प्रतिनिधी । मविप्र संस्थेच्या वादातून निर्माण झालेल्या प्रकरणी अॅड. विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी कोथरूड पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले आहे.
मविप्र संस्थेेचे संचालक अॅड.विजय पाटील यांनी निंभोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादी नंतर पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात संबंधीतांवर गुन्हा नोंदविण्यात आलेले आहे. याच गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी कोथरूड पोलिसांचे पथक जळगाव शहरात दाखल झाले आहे.
मविप्र सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून तेथे निवडणुका घेतल्या होत्या. निवडून आलेल्या संचालकांना प्रशासकाने पदभार दिला होता. असे असताना संचालक मंडळाकडून पदभार काढून सत्ता भोईटे गटाकडे देण्यात आली होती. यात शिक्षण विभागाने दिलेल्या पत्राची भूमिका महत्वाची होती. संस्थेतील अचानक सत्तांतर झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी कुणाच्या सांगितल्यावरून संस्थेवर पूर्णवेळ पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या बाबींची चौकशी करण्यासाठी कोथरूड पोलिसांचे चार अधिकार्यांचे पथक गुरुवारी जळगावात आले आहे.