जिल्हा दुध संघाची न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा सहकारी दुध संघावरील प्रशासक नियुक्तीला आव्हान देणार्‍या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून याचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दुध संघावर राज्य सरकारने प्रशासक मंडळाची नियुक्ती केल्यामुळे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ हे बरखास्त झाले आहे. प्रशासक मंडळाने कार्यभार देखील सांभाळला आहे. दरम्यान, प्रशासक मंडळाची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा करत संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. यावर दोन्ही बाजूंनी सुनावणी हे शुक्रवारी पूर्ण झालेली आहे.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने याचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल नेमका केव्हा लागेल याबाबत माहिती देण्यात आली नसली तरी साधारणपणे पुढील आठवण्यात याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जिल्हा दुध संघाचील अनियमित खर्चाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर आता अधिकार्‍यांनी चौकशी सुरू केल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे येत्या काही दिवसात एकीकडे न्यायालयात निकाल लागत असतांना दुध संघातील कथित गैरव्यवहाराची चौकशी देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Protected Content