Home Cities जळगाव अपात्रता प्रकरणी २९ जानेवारीला कामकाज

अपात्रता प्रकरणी २९ जानेवारीला कामकाज

0
36

जळगाव । घरकूल प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी दाखल केलेल्या खटल्यात आता २९ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. त्यात २९ जानेवारी रोजी कामकाज होणार आहे. शुक्रवारी नगरसेवकांच्या वतीने मुदत मागण्यात आली. उच्च न्यायालयात स्थगितीबाबत १८ रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर जळगाव न्यायालयात कामकाज होईल. या सुनावणीत नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound