Home Cities जळगाव जळगावात कंपनीच्या गोदामाला आग

जळगावात कंपनीच्या गोदामाला आग

0
20

जळगाव प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीच्या गोदामाला आज सायंकाळी आग लागली असून यात लाखोंची हानी झाल्याची भिती आहे.

शहरातील औद्योगिक वसाहतीत असणार्‍या आदर्श इंडस्ट्रीजच्या गोदामाला आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. आगाची माहिती मिळतच औद्योगिक वसाहत पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यासोबत अग्नीशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आली. काही मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण करण्यात आले. मात्र या आगीत लाखोंची हानी झाल्याची शक्यता आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नसली तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound